सुशीला कार्की: नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान
जगभरातील राजकारण आणि प्रशासन क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या दोन मोठ्या घटनांना अलीकडेच साक्षीदार होता आले आहे. एकीकडे नेपाळने आपल्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांचे स्वागत केले.
सुशीला कार्की: नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान
12 सप्टेंबर 2025 रोजी सुशीला कार्की यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि त्या नेपाळच्या इतिहासात पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून नोंदल्या गेल्या.
त्या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायमूर्ती होत्या आणि त्यांच्या निर्भीड व प्रामाणिक स्वभावामुळे त्या सदैव चर्चेत राहिल्या.
शिक्षण प्रवास:
1972 – महेंद्र मोरंग कॅम्पस, विराटनगर येथून बी.ए.
1975 – बनारस हिंदू विश्वविद्यालय, वाराणसी येथून राजनीति शास्त्रात एम.ए.
1978 – त्रिभुवन विश्वविद्यालयातून कायद्याची पदवी (LL.B.)
त्यांनी कारा आणि न्याय अशी दोन पुस्तके लिहिली असून न्याय हे त्यांचे आत्मचरित्र आहे.
कार्की यांची राजकीय नियुक्ती केवळ महिलांसाठी प्रेरणादायी दक्षिण आशियाई देशांमध्ये महिला नेतृत्वाच्या शक्यतांना नवा आयाम देणारी ठरली आहे. त्यांचे कार्यकाळ न्यायसंगत प्रशासन, पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांचे बळकटीकरण यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा